माझा विशेष : जवानांच्या बलिदानात ओवेसींना धर्म कसा दिसतो?
Continues below advertisement
काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्याविरोधात घमासान सुरू आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 44 दिवसात देशाच्या 25 सुपुत्रांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिलं. नुकत्याच सुजवान मध्ये झालेल्या हल्ल्यात सहा जवान आणि एका नागरीकाचा मृत्यू झालाय संपूर्ण काश्मीर सगळा देश या तरण्याबांड जवानांच्या बलिदानाला वंदन करत असताना एम आय एम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी वादग्रस्त विधान करून या जवानांच्या बलिदानाचा अपमान केला. सुंजवानमध्ये शहीद झालेल्या जवानांपैकी 5 जवान हे काश्मीरी मुस्लीम होते त्यामुळे मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं असं विधान त्यांनी केलं. वास्तविक, ओवेसी बंधू हे कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात आता पुन्हा एकदा त्या वाटेवर त्यांनी पाऊल ठेवलं. पण यावेळी राजकीय वादात त्यांनी सैन्याला ओढलं. देशासाठी जीवाची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानात ओवेसींनी धर्म दिसतो कसा?
Continues below advertisement