माझा विशेष : राज्यपाल आजोबा असं का वागले?

Continues below advertisement
तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एक खळबळ उडाली आहे. सेक्स फॉर डिग्री प्रकरण सध्या खूप गाजतं आहे. आणि यात आरोपांचा रोख थेड राज्यपालांकडे आहे. या प्रकरणाचं स्पष्टीकरण देण्यासाठी तामिळनाडूचं राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काल पत्रकार परिषद घेतली. आणि नवा वाद ओढवून घेतला. ही पत्रकार परिषद संपवून निघताना 'द वीक' या नियतकालिकाच्या पत्रकार लक्ष्मी सुब्रमण्यम यांनी राज्यपाल पुरोहित यांना प्रशन विचारला किंबहुना प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पण प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला आणि गाल थोपटले. अर्थातच सेक्स फॉर डिग्री प्रकरण या पत्रकार परीषदेनंतर थंड होण्याऐवजी या नव्या प्रक्रणानं राज्यपाल पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत. ही पत्रकार मला माझ्या नातीसारखी आहे, असं म्हणत त्यांनी माफीनामाही जाहीर केला. मात्र, राज्यपालांची ही कृती त्यांच्या पदाला शोभणारी नाही, अशी टीका सर्वत्र व्हायला लागली आहे. राज्यपाल आजोबा असं का वागले?
कौतुकाचं ठीक आहे पण पदाचा आब राखयला नको का? राज्यपालांच्या कृतीचा चुकीचा अर्थ काढला जातोय? याबाबतच एबीपी माझाची विशेष चर्चा...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram