माझा विशेष : जखम भरली, व्रण मिटणार का?

Continues below advertisement
चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटला आहे. तसंच त्यांनी चाच पे चर्चा ही केली. असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली. साहजिकच न्यायाधीश, न्यायव्यवस्था यांच्या विश्वासार्हतेवर जखमा होवून भळभळ वाहायला लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली अंतर्गत चर्चेतून हे वाद सुटले आहेत. जर हे पेल्यातलं वादळ पेल्यात शमण्याची शक्यता होती, तर त्याला ओसरीवर घेवून यायची काय गरज होती? हा पहिला प्रश्न यामुळे उभा राहतो. या संपूर्ण प्रकारात न्यायालयासारखी घटनात्मक संस्था ढवळून निघते. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होता आणि त्यांच्या मनातल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेवर ओरखडेही उटतात. या न्यायाधीशांच्या 'चाय पे चर्चा' झडतील. पण, या एका घटनेनं झालेले परिणाम निस्तारता येतील....जखमा भरतील... पण या जखमांचे व्रण मिटणार का?
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram