विशेष चर्चा : जागोजागी भटक्या कुत्र्यांचा हैदोस!
Continues below advertisement
राज्यभरात सध्या ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा हैदोस बघायला मिळतोय. भटक्या कुत्र्यांची आकडेवारी समोर आली तर अक्षरशः डोळे फिरतील .. भारतात दर 42 नागरीकांमागे एक भटका कुत्रा आहे.. देशातली एकूण भटक्या कुत्र्यांची संख्या 3 कोटींच्या घरात आहे... आज हा विषय पुन्हा चर्चेला येण्याचं कारण म्हणजे अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरड्याच्या चेहऱ्याचे एका भटक्या कुत्र्याने अक्षरश:लचके तोडले. अवघा पाच वर्षांचा हा चिमुकला ... सुदैवानं त्याचा जीव वाचलाय पण तो गंभीर जखमी झालाय... त्यानंतरही या कुत्र्याने चार-पाच जणांना सुद्धा चावा घेतला... त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी य़ा कुत्र्याची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी, औरंगाबाद, उल्हासनगर, सांगली या शहरांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याकडे कुत्रे आकृष्ट होतात आणि त्यातून या घटना घडत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता या भटक्या कुत्र्यांना आवर कोण घालणार असा सवाल उपस्थित केला जातोय
Continues below advertisement