VIDEO | पवारांची भविष्यवाणी, हे होणार प्रधानमंत्री! | माझा विशेष | एबीपी माझा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाविषयीचा अंदाज वर्तवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा गरम झाल्या आहेत. एनडीएला बहुमत मिळालं नाही तर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.