माझा विशेष : मनसे फक्त बोलघेवड्यांचा पक्ष उरलाय का?

पुण्यात झालेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी आपल्या खास ठाकरी शैलीत राजकीय शेरेबाजी केली.. आणि हे त्यांच्या विरोधकांना झोंबलं नसतं तरच नवल.. राज ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष केवळ बोलघेवडे आहेत त्यांना कामं करण्याला जमत नाहीत असा टोला लगावला. मग मुख्यमंत्र्यांनीही राज ठाकरेंना भाषणातून चिमटे काढले मुद्दा असा आहे.

सामाजिक कार्यक्रमात राजकीय धुरळा उडवण्याची खरंच काही गरज होती का?
कायम आम्हाला सत्ता द्या आम्हाला सत्ता द्या मग आम्ही काय करून दाखवतो ते बघा असं म्हणणाऱ्या राज ठकारेंनी मिळालेल्या सत्तेचं काय केलं.
सिंचन घोटाळ्याचा प्रश्न राज ठाकरेंना शरद पवारांच्या मुलाखतीत कसा पडला नाही.
अजित पवार मनसेला बोलघेवडे म्हणतायत खरंच मनसे बोलघेवड्यांचा पक्ष उरलाय, आणि जर असं असेल तर त्यांना मनावर का घ्यायचं त्यांची टीका एवढी का झोंबते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola