VIDEO | नेत्यांची जीभ चुकून घसरते की ठरवून? | माझा विशेष | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदानही पार पडलं आहे. प्रचारसभांची रणधुमाळी जोरात आहे. असं असताना काही वाचाळवीर मात्र गरळ ओकतच राहिलेत. सपाचे नेते आझम खान यांनी नुकतंच असं एक वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. रामपूर मतदारसंघात अभिनेत्री जया प्रदा त्यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्याच जयाप्रदा यांच्याविरुद्ध आझम खान यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली. आझम खान यांची बोलण्याची पातळी सोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेत्यांची वाचाळगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली. या निमित्ताने पुन्हा एकदा हाच प्रश्न समोर येतोय की, नेत्यांची जीभ ही वारंवार का घसरते. अशा नेत्यांना कायमचं घरी बसवण्यासाठी काही कायदेशीर तरतूद होऊ शकते का हाही प्रश्न या निमित्ताने समोर येतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola