माझा विशेष : सावधान.. पेट्रोल शंभरी गाठतंय
Continues below advertisement
कर्नाटक प्रचाराचा धडाका संपताच दुसरीकडे सुरु झालेला इंधन दरवाढीचा धडाका सुरु झाला तो काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. पेट्रोल डिझेलच्या किमती आता मारुतीच्या शेपटासारख्या वाढायला लागल्या आहेत. या किमती जणू शंभराशी स्पर्धा करत आहेत. सलग गेले सात दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत आणि यात मुंबईचे दर गगनाला टेकले आहेत. मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 40 पैसे तर डिझेलचे दर 72 रुपये 21 पैसे झाले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. वास्तविक 2014 ला कच्चं तेल प्रतिबॅरल 107 रुपये असताना पेट्रोलच्या किमती 60 च्या आत होत्या आणि डिझेल त्यापेक्षा कमी मात्र आता कच्चं तेल प्रतिबॅरल शंभराच्या आत असतानाही या किमती शंभराशी स्पर्धा करत आहेत.
Continues below advertisement