माझा विशेष : हा अर्थसंकल्प तरी ‘अच्छे दिन’ आणणार का?

Continues below advertisement
उद्याचा दिवस संपूर्ण देशासाठी आणि पर्यायानं मोदी सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे...उद्या मोदी सरकार त्यांच्या पाच वर्षातल्या कारभारातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे...त्यामुळे नोटबंदी, जीएसटीनं ग्रासलेल्या जनतेला अर्थमंत्री अरुण जेटली कोणतं नवं गिफ्ट देतात याकडे देशवासियांच्या नजरा खिळल्यात....महिला आणि नोकरदारांच्या पदरी नेमकं काय पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे... आर्थिक पाहणी अहवालात जे आकडे समोर आलेले आहेत त्यानुसार भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे असे अंदाज बांधले जातायत... विकासदर सात ते साडेसात टक्क्यांचा राहील असंही बोललं गेलंय.. मात्र पुन्हा एकदा शेतीचा विकासदर उद्योग आणि सेवांपेक्षा खूप आकड्यांनी खाली राहणार आहे आणि या सगळ्याला हवामानासोबत कमी उत्पादकता, बाजारभाव ही कारणंही आहेत.... तेलाची किंमत वाढती असेल त्यामुळे महागाई ताब्यात कशी राहणार हाही प्रश्नच आहे.. त्यामुळे अर्थसंकल्पात तारेवरची कसरत आहे हे नक्की.. यात अच्छे दिन ज्याचा दावा करत भाजप सत्तेत आलंय ते अच्छे दिन या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात तरी दिसणार का.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram