ABP News

माझा विशेष : असहाय महिला भेकड समाज

Continues below advertisement
राज्यात विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. किंबहूना आज अनेक महिला स्वबळावर कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. असं असलं तरी आजही राज्यातील महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न वारंवार ऐरणीवर येतोय. याला कारणही तसंच आहे. आज मुंबईत अशा दोन घटना घडल्या आहेत. ज्या हा प्रश्न पुन्हा-पुन्हा उपस्थित करायला भाग पाडत आहे. आज नालासोपाऱ्यात एका मुलीला आपली अब्रू वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन उडी मारावी लागली आहे. तर लोकलमध्ये किरकोळ कारणावरुन मित्रानं त्याच्याच एका मैत्रिणीला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. आणि या मुलीला ही मारहाण होताना कोणीही तिला मदत सुद्धा केली नाही.. आपण इतके निबर जालोयत ,,,. संवेदना संपल्यात आपल्यातल्या.. आया-बहिणीला नजरेसमोर कोणीतही हात लावतोय आणि आपल्याला गप्प कसं बसवतं. आणि दुसरीकडे एक अल्पवयीन मुलगी जिवाच्या आकांतानं इमारतीवरून उडी मारतेय अब्रू वाचवण्यासाठी.. या लिंगपिसाटांची हिंमत कशमुळे वाढतेय. जागोजागी पोलिस तैनात असतानाही दिवसाउजेडातसुद्धा या घटना घडतात कशा?
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram