माझा विशेष : साई प्रकटले की नुसताच भास झाला?
देशभरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत एक चमत्कार घडल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
द्वारकामाई मंदिरातील भिंतीवर साईबाबांची प्रतीमा दिसल्याचा दावा भक्तांनी केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बुधवारी मध्यरात्री 12 ते 3 दरम्यान शेकडो भक्तांनी द्वारकामाई मंदिरात गर्दी केली होती.
साईबाबांनी आपल्या हयातीत याच द्वारकामाई मंदिरात अनेक चमत्कार केल्याची भाविकांची श्रद्धा आहे.. कधी पाण्याने दिवे लावले तर कधी भाविकांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिल्याचा दावा भाविक करतात. साई बाबांनी आपल्या हातानं पेटवलेली धूनी आजही या द्वारकामाई मंदिरात जळत असल्याचीही भाविकांची श्रद्धा आहे.
आता साईंची प्रतिमा प्रकटल्याच्या चर्चेनं साई मंदिरात गर्दी झालीय. अनेकांनी हे फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये शुट केले. हे फोटो फेसबुक, व्हॉटसअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.