माझा विशेष : जनतेच्या मनात अजूनही भाजप?
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चारीमुंड्या चित करत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. जयंत पाटील, विश्वजीत कदम, सतेज पाटलांसारख्या दिग्गज नेत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सांगली महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसने इथे यंदा राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. मात्र तरीही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर मात करत, सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपविरोधी सर्व चर्चांचा यामुळे खिळ बसण्याची शक्यता आहे.