माझा विशेष : इफ्तार पार्टीमुळे संघाबद्दलचं मत बदलेल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम मंचाची इफ्तार पार्टी ... यंदाची ही इफ्तारी चांगलीच वादात सापडलेय.. पहिलं कारण म्हणजे याचं स्थळ सह्याद्री अतिथीगृह... सह्याद्री अतिथीगृहाची वास्तू सरकारची आहे, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खासगी कार्यक्रमासाठी का द्यायची? असा सवाल करत विरोधक आणि काही सामाजिक संघटनांनी त्यावर आक्षेप घेतलाय.. तर गेल्या काही काळातीह लव्ह जिहाद, गोहत्या, त्यातून निष्पाप मुस्लिम नागरीकांना झालेली मारहाण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संघाची इफ्तार पार्टी म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याचं म्हणत अनेक नेत्यांनी आणि मुस्लिम संघटनांनी या इफ्तारीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलयं.. मुद्दा असा आहे की शासकीय वास्तू मध्ये खासगी इफ्तारी आयोजित करण्याचं कारण काय... आणि इफ्तार पार्टीमुळे संघाविषयीचं मत बदललेल... या आधी संघाशी संलग्न अनेकांनी इतर इफ्तार पार्ट्यांना आक्षेप घेतला होता,.... आता त्यांना इफ्तारीचं वावडं राहीलेलं नाही का... आणि इफ्तारीचं ठीक आहे हो.. पण निष्पाप नागरीकांना छळणाऱ्या स्वयंघोषीत गोरक्षक, धर्मरक्षक यांना संघ रोखणार का