माझा विशेष : इम्रानने बोलावलं म्हणून पळत सुटावं का?

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याला शेजारी देशातील दिग्गजांना निमंत्रित केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच नामवंत क्रिकेटपटू, अभिनेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण असल्याची माहिती आहे. अभिनेता आमीर खान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. 1992 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यावर्षी कपिल देव भारतीय क्रिकेट संघात खेळत होते. त्यामुळे कपिल देव यांच्याशी इम्रान यांचं खास नातं आहे. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. इम्रान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola