माझा विशेष : नक्की कोण चुकतंय? नायब राज्यपाल की केजरीवाल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2018 07:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयएएस अधिकाऱ्याला आप कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ दिल्लीत आयएएस अधिकाऱ्यांनी असहकार पुकारला आणि तेव्हापासून दिल्लीत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय... या कामबंद आंदोलनामुळे दिल्लीचा कारभार ठप्प झालाय.. या अधिकाऱ्यांना तातडीनं कामावर रूज होण्याचे आदेश द्यावे यासाठी गेले आठ दिवस केजरीवाल उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेयत.. या आधी उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर सुरु असलेल्या उपोषणाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबूं आणि केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी पाठिंबा दिलाय ... त्यांच्यासोबत आता शिवसेनाही यात उतरली आहे.