माझा विशेष : प्रशांत परिचारकांवर मेहरबानी का?

Continues below advertisement
देशाचे जवान आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना कायमस्वरुपी बडतर्फ करा, या मागणीवरून आज सदनात विरोधकांनी गोंधळ घातला. या सगळ्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी की, मागील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूकांच्या काळात पंढरपूर तालुक्याततल्या भोसे गावातल्या प्रचारसभेत आमदार प्रशांत परिचारक यांची जीभ घसरली. त्यांनी लष्करी जवानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यामुळे परिचारकाचं निलंबन दीड वर्षांसाठी करण्यात आलं आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीनं आपला अहवाल सादर करताना परिचारकांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस केली. ज्यावर तारखेला सदनात मंजुरी मिळाली. आणि अवघ्या वर्षभराच्या आता परिचारकांचं निलंबन मागे घेतलं गेलं. मात्र, यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. आणि परिचारकांच्या कायमस्वरुपी बडतर्फीची मागणी केली. यात विरोधकांच्या जोडीला सत्ताधारी काँग्रेसही आहे. मुद्दा असा आहे की, परिचारकांवर एवढी मेहेरबानी का? ज्या समितीचा अहवाल आला त्या समितीत सर्वपक्षीय नेते होते. मग निलंबन मागे घेण्याची शिफारस सर्वानुमते झाली की यातही काही वेगळा प्रकार झालेला आहे. आणि जर सर्वानुमते झाली असेल तर आत्ता विरोध का होतोय? यावर चर्चा करायची आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram