माझा विशेष : निलंगेकरांवर एवढी मेहेरबानी कशासाठी?
शेतकऱ्यांना आणि गरीबांना कर्जवसूली साठी तगादा लावणाऱ्या बँका राजकारणी आणि उद्योगपतींसमोर कशा झुकतात याचं एक उदाहरण समोर आलंय.. संभाजी पाटील निलंगेकर जामीनदार असलेल्या व्हिक्टोरीया अॅग्रो फूड प्रोसेसिंग या कंपनीचं 76 कोटी 90 लाख कर्जापैकी 51 कोटी 40 लाख माफ केलेयत.... आज या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना क्लीन चिट दिलेय.. हे सगळं रिझर्व बँकेच्या नियमांनुसारच झालंय असं सांगत निलंगेकरांची त्यांना पाठराखण केलेय.. हे जरी लक्षात घेतलं तरी एक प्रश्न राहतोच... जर निलंगेकरांसारखा राजकारणी नसता तर एवढं मोठं लोन वेव्हर मिळालं असतं का.. निलंगेकर या कंपनीप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी कर्जमाफीसाठी उभे राहतील का... बँकांना एवढं नुकसान सहन करत कर्जमाफी परवडते कशी