मराठा आरक्षण अहवाल दृष्टीपथात? । एबीपी माझा । माझा विशेष

मुंबई उच्च न्यायालयात 15 तारखेला मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सादर होत आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. सुमारे दोन लाख निवेदनं, 45 हजार कुटुंबांचं सर्वेक्षण झालं आहे. आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला उद्या सादर होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात महाराष्ट्राचा भविष्यकाळ बदलेल अशा काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आयोगाने केला आहे. पूर्वी दिलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आयोग मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस करण्याची शक्यता आहे. मराठा समाजाची महाराष्ट्रात नेमकी संख्या किती? कुणबी आणि मराठा एकच का? या प्रश्नांचीही उत्तरं मिळणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola