माझा विशेष : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा वापर?

Continues below advertisement
निवडणूक जिंकायची असेल, तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानला विनाकारण खेचू नका, असं वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.

आपण पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. तिथं त्यांनी भारत पाक संबंध सुधारायचे असतील, तर नरेंद्र मोदींना रस्त्यावरुन हटविण्याची भाषा केली होती, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील एका सभेत केला होता.

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. गुजरातची निवडणूक जिंकायची असेल, तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. विनाकारण त्यामध्ये पाकिस्तानला खेचू नका, असं स्पष्ट शब्दा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं संगितलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मणिशंकर अय्यर यांच्या निवास्थानी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत झालेल्या बैठकीच्या आरोपांनंतर भारताचे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी खुलासा केला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भारत-पाक संबंधांवरच चर्चा झाल्याचं दीपक कपूर यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram