मराठ्यांचं आरक्षण कोर्टात टिकेल काय? | माझा विशेष | एबीपी माझा
मराठा समाजाला स्वतंत्रपणे दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून विभागीय स्तरावरील संवाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. राज्यातील सर्व विभागांमध्ये अशाप्रकारे संवाद यात्रा काढून आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुण्यातील एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावरुन संवाद यात्रेला सुरुवात झाली.