कौल कर्नाटकचा : कर्नाटकच्या एक्झिट पोलमध्ये कुणाचं पारडं जड?

अख्ख्या भारताचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकासाठी आज मतदान पार पडलं. आत्तापर्यंत 70 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी आज मतदान झालं. यात एकूण 2 हजार 600 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे.

कर्नाटकमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजेच 107 जागा, काँग्रेसला 88 तर जेडीएसला 25 जागा मिळतील असं एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola