VIDEO | दाऊदची शरणागती कोणी रोखली? | माझा विशेष | एबीपी माझा
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोट तसेच दंगलीचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. मात्र पवार यांनी या प्रस्तावकडे दुर्लक्ष केले, असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून गंभीर आरोप केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. आंबेडकर यावेळी म्हणाले की, मी राज्यसभेत खासदार होतो त्यावेळी राम जेठमलानी देखील खासदार होते, आम्ही दोघे मित्र होतो. त्यांनीच मला ही माहिती पहिल्यांला दिली असे त्यांनी म्हटले आहे. दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. शरद पवार यांनी खुलासा करावा की त्यांनी ही माहिती पंतप्रधान दिली होती का? त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का? आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण?, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.