माझा विशेष : कोरेगाव-भीमा नेमकं कोणी पेटवलं?

नक्षलवाद्यांकडून राजीव गांधी हत्याप्रकरणासारखं काहीतरी घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीही नक्षल्यांच्या निशाण्यावर होते. असं सरकारी वकिल उज्वला पवारांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं आहे. याबाबत एक पत्र पोलिसांना मिळालं असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केलाय.
एम ४ नावाचं शस्त्र आणि त्यासाठी ४ लाख राऊंड खरेदी करण्याची तयारी असल्याचा धक्कादायक उल्लेख करण्यात आलाय.. तर यासाठी ८ कोटी रुपये देण्याची तयारीही दर्शवल्याची माहिती आहे. मात्र सरकार खोटी कागदपत्रं तयार करुन एल्गार परिषदेच्या आयोजकांना यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना नुकतीच अटक केली आहे .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola