माझा विशेष : गुन्हा दाखल, मग भिडे गुरुजींना अटक का नाही?
Continues below advertisement
भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींना अटक का झाली नाही.. याचा जाब विचारत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा मुंबईत धडकला.. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळीच मध्यस्ती केलेय.. कारवाईचं आश्वासन दिलंय.. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय.. यात कारवाई झाली नाही तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय... मात्र यात मुख्य प्रश्न असा आहे की संभाजी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल आहे मग कारवाई का होत नाही... या बाबतीत पोलिस कोणाच्या दबावाखाली आहे का.. प्रकाश आंबेडकर यांनी आरोप लावल्याप्रमाणे भिडे गुरुजींना कोण पाठीशी घालतंय.. कारवाईबद्दल पोलिसांचं बोटचेपं धोरण पाहिल्यास यात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी घाई केलेय...
Continues below advertisement