माझा विशेष : आप पैसेवाल्यांचा पक्ष झाला आहे का?
आम आदमी पक्षात सगळ्याच गोष्टी आम बनत चालल्या आहेत खास असं काही राहीलंच नाहीये. विचारवंतांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा समजला जाणारा हा पक्ष मात्र आता या पक्षाला घरघर लागलेय. अनेक जुने जाणते कार्यकर्ते पक्षाला सोडून गेलेयत. हे कमी म्हणून की काय, आपनं राज्यसभेची उमेदवारी घोषित केली, एन डी गुप्ता, सुशील गुप्ता आणि संजय सिंग ... ही ती तीन नावं यापैकी आप कार्यकर्ता असं एकच नाव आहे संजय सिंग याचं, बाकी दोन्ही उमेदवार हे आयात आहेत. मात्र या नावांच्या घोषणेनंतर आपच्या जवळ असलेल्या बहुतेकांनी आपवर पैसे घेत उमेदवारी दिल्याचे आरोप केले आहेत, आपनं मूल्य सोडून पैसैवाल्यांची साथ द्यायला सुरवात केली आहे, आप आता इतर पक्षांच्या पंगतीत जावून बसलाय अशी ओरड सुरू आहे. कारण उमेदवारांपैकी एन डी गुप्ता हे सीए आहेत दिल्लीतलं बडं प्रस्थ आहेत ,,,तर सुशील गुप्ता कोट्यधीश उद्योगपती आहेत आणि कांग्रेसला सोडचिठ्ठी देवून आप मध्ये दाखल झालेयत. आपच्या या आयातांना गोंजारण्याच्या नीतीनं कार्यकर्त्यांना मात्र दुःख जालंय... अगदी त्यात आप नेते कुमार विश्वास यांचाही सहभाग आहे. तथ्य काय आहे.. आप पैसेवाल्यांचा पक्ष बनत चाललाय, आपमध्ये कार्यकर्ते असताना उमेदवार आयात का केले जातायत.