स्पेशल रिपोर्ट | मुंबई | बोट दुर्घटनेत अक्षम्य हलगर्जीपणा नडला का?
शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला गेलेल्या एका स्पीड बोटीचा अपघात झालाय. दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात मुंबईतील वाकेल्याच्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झालाय. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईच्या समुद्रात गेलेल्या बोटींपैकी एक बोट लाईटहाऊसजवळ एका खडकाला धडकली. यात बोटीच्या खालच्या बाजूला मोठं भगदाड पडलं आणि त्यातून पाणी आत गेल्यानं बोट बुडाली. या बोटीत एकूण २४ जण होते. त्यातील सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य २३ जण बचावले आहेत. या दुर्घटनेनंतर शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, एबीपी माझाच्या हाती लागलेल्या एका व्हीडिओत या दुर्घटनेची विदारकता आपल्या लक्षात येतेय.