स्पेशल रिपोर्ट : कर्जबुडव्या कंपन्यांवर बँका मेहेरबान का?

कर्जबाजारी कंपनीकडून कर्जाची सक्तीनं वसुलू करायची सोडून बँकाकडून खुल्या हातानं त्यांची कर्जमाफी होताना दिसत आहे.
कारण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल १० बँकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ लाख कोटींचं कर्ज माफ केलंय.
मागील आर्थिक वर्षाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये या कर्जमाफीत म्हणजेच राईट ऑफ्समध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झालीये.
सेंट्रल बँकेच्या एका अहवालानुसार तर २०१४ ते २०१७ सप्टेंबर या राष्ट्रीय बँकांनी तब्बल २ लाख ४२ हजारांची कर्जमाफी देऊ केलीए. त्यामुळे एकीकडे बँकेच्या अनुत्पादक भांडवलात म्हणजेच NPA मध्ये वाढ होत असताना अनेक बड्या कंपन्यांची कर्ज माफ करण्याचं वेळ बँकांवर आलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola