EXCLUSIVE : स्वदेशी विमानाचे शिल्पकार कॅप्टन अमोल यादव यांच्याशी खास बातचित

Continues below advertisement
अमोल यादव यांच्या स्वदेशी बनावटीचं विमान आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं. आणि यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: अमोल यादव यांना पत्र देणार आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत अमोल यादव यांना राज्य सरकारने पूर्ण सहकार्य केलं. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांच्या सहा आसनी विमानाची परवानगी रखडली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयानं त्यात हस्तक्षेप केला. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली. त्यामुळे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं सहा आसनी विमान झेपावण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram