मुंबईत तुमचे मोबाईल कसे चोरी होतात
Continues below advertisement
मुंबईकरांची लाईफ लाईन असणाऱ्या लोकलमध्ये मोबाईल कसे चोरी होतात हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. डोंबिवली स्थानकावर प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरतानाचा एक व्हीडिओ माझाच्या हाती लागलाय. प्रवासी गाडीत शिरत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे अगदी सराईतपणे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करतात. मोबाईल चोरी करणाऱ्यांची एक खास पद्धत असते.. प्रवासी स्थानकात आल्यापासून मोबाइल चोर त्याच्यावर पाळत ठेवतात. लोकल आल्यावर तो आपला मोबाइल कुठे ठेवतो ते हेरले जाते. आणि हीच संधी साधत लोकलमध्ये चढत असताना चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल अगदी सहज चोरतात.
Continues below advertisement