एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन 31/08/2018

#smartbulletin #स्मार्टबुलेटिन #abpmajha
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन ही एक अभिनव संकल्पना. साधारणपणे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वप्रथम एबीपी माझाने हा प्रयोग सुरु केला. यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्या अतिशय थोडक्यातील तपशील त्यांच्या यूआरएलसह व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित होऊ लागल्या. व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हजारो लोकांच्या हातातील स्मार्टफोनमध्ये सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान पोहोचतात. अनेकांना दिवसभरातील कामाच्या धबडग्यात बातम्या पाहणं शक्य होत नाही, त्यांना सायंकाळी या बातम्या म्हणजे पर्वणीच असते. विदर्भातील काही शाळांनी एबीपी माझाच्या या अतिशय लोकप्रिय झालेल्या बातम्या वाचनाचा प्रयोग उत्स्फूर्तपणे राबवला. आधी फक्त मजकूराच्या म्हणजे टेक्स्ट फॉरमॅटमध्ये असलेल्या या बातम्या अलीकडेच व्हिडिओ स्वरुपात देण्याचा निर्णय झाला. व्हिडिओ फॉरमॅटमधील या बातम्याही खूप लोकप्रिय होत आहेत. एबीपी माझाचं हे स्मार्ट व्हिडिओ बुलेटिन व्हॉट्सअप प्रमाणेच फेसबुक आणि यूट्यूबही अपलोड होत असतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola