माझा हस्तक्षेप : पहिलीत प्रवेशाची घाई कशाला?

Continues below advertisement
आपल्यातल्या काही जणांना वय कमी पडतंय त्यामुळे शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा किंवा एकाच इयत्तेत दोन वर्ष बसण्याचा अनुभव आलेला असेल. महाराष्ट्रात पहिली प्रवेशासाठी संबंधित वर्षाच्या 30 सप्टेंबर आधी विद्यारथ्याचं वय सहा वर्ष पूर्ण असण्याची अट आहे. मात्र राज्यात पहिली प्रवेशाचं वय सहावरून पाच करावं अशी मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केलेय. देशातील इतर बहुतांश राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय 5 पाच वर्षे आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. असं उदाहरण त्यांनी दिलंय किंबहुना दावाच केलाय .  मुलांचा सर्वांगिण विकास होवून मुलं पहिलीत जाण्यासाठी शारीरीक आणि मानसिक दृष्ट्या तयार असण्यासाठी वयाची 6 वर्षे पूर्ण अशणं आवश्यक आहे अशं विनोद तावडे यांनी सांगत वयाची मर्यादा कमी करण्याची ही मागणी फेटाळून लावली आहे. मुळात प्रश्न असा आहे की पाच आणि सहा हे केवळ एका वर्षाचं अंतर असतं. मग या एका वर्षानं खरंच इतका फरक पडतो का.. पहिली प्रवेशाची घाई कशासाठी ... भविष्यातल्या स्पर्धेसाठी मुलांना कोवळ्या वयात दावणीला बांधणं योग्य आहे का.. मत-मतांतरं यावर मांडण्यात आली त्यामुळे यात चर्चेच्या माध्यमातूून हस्तक्षेप करत वस्तुस्थिती पडताळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram