माझा हस्तक्षेप : अंबानींच्या अदृश्य संस्थेला पायघड्या कशासाठी?
Continues below advertisement
जिओ हे नाव घेतलं की मोबाईल सेवा देणारी एक कंपनी असं कोणीही सांगेल.. मात्र मनुष्यबळ विकास मंत्रालयाला या जिओ इन्स्टीट्यूट नावाची एक युनिव्हर्सिटी सापडलेय..त्यांनी लगेच तिला सर्वोत्कृष्ट संस्थांच्या यादीत आणून बसवलं देखील. ही इन्स्टीट्यूट आहे रिलायन्स फाउंडेशनची अर्थात अंबानींची.. या इन्स्टीट्यूटचा पत्ता अऩेकांनी शोधण्याचा बराच प्रयत्न केला, आम्हीही केला पण तो सापडला नाही. बरं आम्हाला नाही गूगलला तरी सापडेल पण तिथेही नाही.. .मग ही जिओ इन्सटीट्यूट नावाची काय भानगड आहे हा प्रश्नच आहे ..बरेच प्रश्न उठू लागल्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं.ग्रीनफील्ड कॅटेगरीमधून या संस्थेची निवड करण्यात आलीय. ज्या गोष्टी प्रत्यक्षात जमिनीवर अस्तित्वात नाहीत, प्लॅनिंगच्या अवस्थेत आहेत त्यांना ग्रीनफील्ड म्हणतात. म्हणजे जिओच्या केवळ कागदावरच्या योजनांवर खूश होऊन त्यांना हा सर्वात प्रतिष्ठेचा बहुमान जाहीर करण्यात आला. ग्रीनफील्ड कॅटेगरीतून मग रघुराम राजन यांच्या संस्थेला का हा मान मिळाला नाही.. इन्स्टीट्यूट ऑफ एमिनेन्स हा दर्जा आहे आणि तो जाहीर झाल्यानंतर या संस्थानां एक हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे आणि ऑटोनॉमनस अधिकारही त्यांना अशतील.. 11 ग्रीनफिल्ड अर्जांपैकी फक्त जिओचं चांगभलं कशामुळे.. असे प्रश्न पडलेत त्यात चर्चेच्या माध्यमातून आम्ही हस्तक्षेप करतोय
Continues below advertisement