माझा हस्तक्षेप : रेल्वे-पालिकेच्या वादात मुंबईकरांची सुरक्षा ढगात!

Continues below advertisement
एकीकडे धो-धो पाऊस, गुडघाभर पाण्यात बुडालेले रस्ते, त्यात पूल कोसळल्याची बातमी आणि वेळेत ऑफीस गाठण्यासाठी धावपळ यामुळे मुंबईकर आज पूर्ता हैराण .... मुंबईत आता अशी परिस्थिती नेहमीचीच झालेय... मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा बळी घेतल्यानंतरही रेल्वे आणि पालिकेला जाग आल्याचं दिसून येत नाहीये...उलट आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू आहेत, आणि या खेळात मुंबईकर मात्र अधांतरी लटकतोय... ..अंधेरी स्टेशनवरील गोखले पुलाचा काही भाग आज सकाळी कोसळला...
दैव बलवत्तर म्हणून रेल्वे पुलाखाली नव्हती, नाहीतर मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असतं, चार जण यात जखमी झाले... आणि अर्थातच या घटनेनं मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आणि अवघ्या काही वेळात अवघी मुंबई विस्कळीत झाली... एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा जीव गेल्यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही. महापौरांनी तर दुर्घटना घडल्यानंतर या पुलाची जबाबदारी आमची नव्हतीच असं सांगून जबाबदारी झटकायचं काम सगळ्यात आधी केलं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram