GRAPHICS VIDEO | बचावकार्याला यश, समुद्रात अडकलेल्या अभिलाष टॉमींची सुटका

Continues below advertisement
गोल्डन ग्लोब स्पर्धेदरम्यान हिंदी महासागरात अडकलेले नौदलाचे अधिकारी अभिलाष टॉमी यांना वाचवण्यात अखेर यश आलंय. भारतीय नौसेनेनं याबाबत ट्वीटरवरुन माहिती दिलीय. अभिलाष टॉमी हे सध्या गंभीर जखमी असले तरी ते शुद्घित आहेत. आणि त्यांना फ्रान्सच्या मच्छिमार बोटीवर हलवण्यात आलं आहे. हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळं टॉमी यांच्या स्वदेशी बनावटीच्या थुरीया या बोटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शुक्रवारी सॅटेलाईटद्वारे त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांची माहिती नौदलाला मिळाली. त्यानंतर टॉमी यांच्या बचावासाठी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बचाव पथकांनी धाव घेतली आणि अखेर त्यांना रेस्क्यू करण्यात यश आलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram