निकालाआधीचा निकाल | भाग 5 | मध्य प्रदेशचा एक्झिट पोल, काँग्रेस सत्ता काबीज करणार?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमधील मतदारांची मतं ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 15 वर्षांचा वनवास संपवून काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवली जात आहे. सत्ताधारी भाजप बहुमतापासून बराच दूर राहण्याची चिन्हं सर्वेक्षणात दिसत आहेत.