विशेष चर्चा : माहिती अधिकार कार्यकर्ते की खंडणीखोर?
ठाणे महानगरपालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या नावाखाली अनेक जण सर्रास ब्लॅकमेलिंगचा धंदा करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय......नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी सूचना मांडताना सरनाईक बोलत होते...विशेष म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या आरोपाला सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिलाय. शासकीय व्यवस्थेतून आरटीआय कार्यकर्ते माहिती घेतात नंतर हरकत घेतात मग सेटलमेंट करतात असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी केलाय...