विशेष चर्चा : कपटी कांगारुंवर आयसीसीची मेहेरबानी का?

Continues below advertisement
केपटाऊन कसोटीत कांगारूंचा रडीचा डाव समोर आला आहे... क्रिकेटमध्ये बॉल टॅम्परिंग काही नवीन नाही.. परंतु हे प्रकरण वेगळं म्हणायला हवं. कारण यात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं स्वतः समोर येऊन हे बॉल टॅम्परिंग हा आमच्या लीडरशिप ग्रुपच्या रणनीतीचा भाग होता अशी कबुली दिलीय.. त्यावरचा कळस म्हणजे इतकी गंभीर बार आयसीसीनं मात्र गांभीर्यानं घेतल्याचं दिसत नाहीये.. त्यांनी बॅनक्रॉफ्टला मानधनाच्या 75 रक्कमेचा दंड आणि कर्णधार स्मिथवर 100 टक्के दंड आणि केवळ एकाच सामन्याची बंदी घातलेली आहे... बॉल टॅम्परिंग अत्यंत गंभीर आहे.. मग आयसीसीची ऑस्ट्रेलियावर एवढी मेहेरबानी का? आणि स्मिथनं प्रामाणिकपणे कबुली दिलीय. त्यामुळं अनेकांना त्याचा पुळकाही आलाय.. तर या प्रामाणिकपणाचा बेनिफिट ऑफ डाऊट स्मिथला देता येईल का?
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram