EXCLUSIVE : नाशिकमध्ये आदिवासी खेळाडूंच्या प्रबोधिनीची विदारक अवस्था

Continues below advertisement
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातली पहिली क्रिडा प्रबोधिनी नाशकात सुरु करण्यात आली. राज्यभरातून आदिवासी समाजातील मुलं इथं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू होण्याचं स्वप्न बाळगून दाखल झालेत. मात्र इथली अवस्था विदारक आहे. विभागीय क्रिडा संकुलात सुरु करण्यात आलेल्या या वसतिगृहात एकाच रुममध्ये आठ-आठ मुलांना कोंबण्यात आलंय.
त्यांना झोपायला नीट बेडही उपलब्ध नाही. दुसरीकडे जेवणाच्या नावाखाली केवळ पोळी-भाजी-वरण दिलं जातंय.
डाएटच्या नावानं बोंब आहे. मग अशा अवस्थेत ही मुलं मैदानावरचं प्राविण्य कसं मिळवणार? असा प्रश्न विचारला जातोय.
विशेष म्हणजे मुलांना देण्यात येणारं जेवण, खेळाचं साहित्य, शूज आणि ट्रॅक सूटही निकृष्ट दर्जाचे आहेत. शिवाय तीन तीन वर्ष ही मुलं एकाच ट्रॅक सूटवर काढतायत. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram