अयोध्या : राम मंदिर उभारणीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मौलानांवर खळबळजनक आरोप

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मौलानांवर खळबळजनक आरोप होतोय. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे माजी सदस्य मौलाना सलमान हसन नदवी यांनी वादग्रस्त जागेवरील मशिदीचे हक्क सोडण्यासाठी पाच हजार कोटींची लाच आणि राज्यसभेची खासदारकी मागितल्याचा आरोप अयोध्या सद्भावना समन्वय महासमितीचे अध्यक्ष अमरनाथ मिश्रा यांनी केला आहे. तसेच 200 एकर जमीनही मागितली असा आरोपही मिश्रा यांनी केलाय. नदवींनी लाच मागितल्यानंतर पाच फेब्रुवारीला आपली भेट घेऊन बाबरी मशीद-रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर चर्चाही केल्याचा दावा मिश्रांनी केलाय़. दरम्यान, नदवींनी मिश्रांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola