पीपीएफ, किसान विकसपत्रामध्ये गुंतवणुकीसाठी 'आधार' सक्तीचं
Continues below advertisement
यापुढं भविष्य निर्वाह निधी आणि किसान विकास पत्रमध्ये गुंतवणुक करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं याबाबत ४ वेगवेगळ्या अधिसुचना काढल्या आहेत. यामुळं आधी गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांनाही आपला आधार क्रमांक संबंधित संस्थेला द्यावा लागणार आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं याआधीही १३५ वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं केलं आहे, त्यात आता या योजनांची भर पडली आहे.
Continues below advertisement