नवी दिल्ली : सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही

Continues below advertisement
नवी दिल्ली : मोबाईलचं नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड सक्तीचं नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. सिम कार्ड खरेदी करताना 'आधार'सक्ती करता येणार नसल्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

सिम कार्डसाठी ओळखपत्र म्हणून मोबाईल ऑपरेटर कंपनी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदार कार्ड या पर्यायांचाही स्वीकार करु शकतात, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. मोबाइल कंपनींनी त्वरित या आदेशाची अंमलबजावणी करावी, असंही टेलिकॉम सचिव अरुण सुंदराजन यांनी सांगितलं.

फक्त आधार कार्ड नाही, या कारणामुळे ग्राहकाला सिम कार्ड देण्यास मनाई करता येणार नाही. केवायसी फॉर्म भरताना ओळखपत्र म्हणून इतरही पर्याय स्वीकारण्यास हरकत नसल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. सिम आधारशी लिंक करण्याचे आदेश कधी दिले नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram