मुंबई: सातवा वेतन आयोगाला गणेशोत्सवाचा मुहूर्त?
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेला राज्य सरकारनं गणेशोत्सवाचा मुहूर्त निवडला आहे. थकबाकीचा सुमारे 5 हजार कोटींचा पहिला टप्पा गणेशोत्सवाच्या काळात थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा होणार आहे. त्यामुळं सातवा वेतन आयोग थेट दिवाळीपासून लागू होणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष वाढीव पगार हा दिवाळीच्या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करतांना राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 21 हजार कोटींचा भार पडणार आहे.