देशातील 79 टक्के महिला आणि 78 टक्के पुरुषांची अपत्य म्हणून मुलींना पसंती

Continues below advertisement
वंशाचा दिवा म्हणून कुटुंबात मुलगाच जन्माला यावा ही भारतीयांची मानसिकता आता बदलत चाललीय. कारण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून तशी आशादायक आकडेवारी समोर येतेय.. देशातल्या 79 टक्के महिलांना आणि 78 टक्के पुरुषांना वाटतं की आपल्या कुटुंबात एक तरी मुलगी जन्मावी..15 ते 50 या सरासरी वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय. विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील सर्वाधिक महिला आणि पुरुषांना वाटतं की त्यांच्या घरात एकतरी मुलगी जन्मावी.. तसंच श्रीमंतांपेक्षा गरीब कुटुंबियांची मानसिकता मुलींच्या जन्माबाबत जास्त सकारात्मक असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलंय. असं असलं तरी वंशाला दिवा म्हणून एक तरी मुलगा असावा असं वाटणाऱ्या 82 टक्के महिला आणि 83 टक्के पुरुष देशातल्या वेगवेगळ्या भागात आहेत.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram