712 यवतमाळ: खरेदी केंद्र बंद झाल्यानं तुरीचा प्रश्न गंभीर, महाबीजमध्येही हमीभावापेक्षा कमी भाव
Continues below advertisement
खरेदी केंद्र बंद झाल्यानं तूर खरेदीचा प्रश्न आणखी गंभीर झालाय. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाही खाजगी व्यापाऱ्याकडे कमी दरात तूर विकावी लागतेय. अशी परिस्थिती असतांना महाबीज हा शेतकऱ्याचा आधार बनणं अपेक्षित होतं. मात्र इथे हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केली जातेय. यवतमाळमधील महाबीजमध्ये शेतकऱ्यांना ४ हजार ९१० रुपयांचा दर मिळतोय.
Continues below advertisement