712 | मान्सून अपडेट
गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. विदर्भ, मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झालीये. पावसाचा खंड पडल्यानं काही भागात पिकं करपण्याची वेळ आली होती. अशा भागात या पावसानं दिलासा दिलाय. येत्या २४ तासातही असाच पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.