712 : मान्सून अपडेट
गेल्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये मात्र तितकासा पाऊस झाला नाही. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसून येतंय. येत्या २४ तासातही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाये.