712 | मान्सून अपडेट
काल राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालंय. येत्या २४ तासातही अशीच काहीशी परिस्थीती राहील अशी चिन्ह आहेत. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाये.