712 | मान्सून अपडेट
राज्यातील पावसाचं प्रमाण कमी झालं असलं, तरी वातावरणातील आर्द्रता वाढताना दिसतेय.याचा विपरीत परिणाम फळपिकांवर होताना दिसून येतोय. राज्यात काही भागात वातावरण कोरडं आहे. या सॅटेलाईट इमेजमध्ये दाखवल्या प्रमाणे राज्यात उत्तर विदर्भात ढगांची दाटी बघायला मिळतेय. येत्या २४ तसात विदर्भासह मराठवाड्यात काही भागांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.