712 | मान्सून अपडेट
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसानं जोर धरला होता. बऱ्य़ाच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थितीही निर्माण झाली. मात्र आता हा जोर ओसरल्याचं दिसतंय. ढग आता काहीसे पुर्वेकड़े प्रवास करताना दिसतायत. काल देखील कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पाऊस झाला. येत्या २४ तासातही अशी परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.