युरियाची आयात 42 लाख टनांवर | 712 | एबीपी माझा
देशात खतांमध्ये युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे देशात युरियाची आयातही मोठ्या प्रमाणात होते. यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत देशात जवळपास ४२ लाख टन युरियाची आयात करण्यात आलीये. या आयातीसाठी जवळपास १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च करण्यात आलाय. याबाबतची माहिती नुकतीच केंद्र सरकारनं दिली. बाकी खतांपेक्षा युरियाच्या दरावर केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. तसच राज्य सरकारच्या मालकीच्या कंपन्यांना युरियाची थेट आयातही करता येते. याच कारणानं युरियाची मागणीही वाढती आहे.